
सरसगड ठिकाण - पाली श्रेणी- मध्यम (पावसात) सरसगड तस कुठेही जायचा प्लॅन नव्हता शनिवारी अचानक वैभव चा फोन आला, मी प्रशांत ला पण फोन वर जोडून आमच्या तिघांमध्ये कुठे जायचे ह्यावर वाद चालू असतानाच सरसगड ठिकाण ठरले. देवदर्शन + ट्रेक हां हेतू भिडूंची सावरसावर झाली व आम्ही ५ जण ठरलो. गाडीने जायचा बेत होता म्हणून जास्त जण नेऊ शकत नव्हतो. सकाळी ७ वाजता पनवेल एसटी बस डेपो ठिकाण ठरले. तसा मी ही घरातून गाडी घेऊन लवकर निघालो व पनवेल ला लवकर पोचण्याचा प्रयत्न केला तास रस्ता एक तास १० मिनिटाचा आहे पण खड्डे व रस्त्यात झालेल्या ट्रॅफिक मुळे वेळ अधिक लागला. आमच्या गटातले ४ भिडू माझ्या आधीच पनवेल एस टी डेपो जवळ येऊन उभे राहिले होते. आम्ही क्षणाचा विलंब ही न करता लगेच पाली साठी प्रस्थान केले. एक चांगली गोष्ट अशी क...