
हरिश्चंद्रचे नेढे शोधमोहीम ०६ आणि ० ७ फेब्रुवारी २०२१ नेढ्याच्या ट्रेक करायचा हे स्वप्न मागच्या ३ वर्षांपासून उराशी बाळगून होतो . मागच्या वर्षी कोरोना चा हाहाकार, आणि २०१९ मध्ये पावसाचं डिसेंबर पर्यंत थांबणे ह्यामुळे हां ट्रेक करता आला नव्हता . हा ट्रेक करायचा म्हणझे तुमची टिम हि खूप मजबुत हवी . २०२१ ह्या वर्षाची सुरवात फार चांगली झाली होती कोरोना वर औषध आले होते म्हणून जे जनजीवन २०२० मध्ये विस्कळीत झाले होते. ते २०२१ मध्ये हळू हळू पूर्वपदावर यायला लागले होते . व्ही - रेंजर्स ह्या संस्थेने हरिश्चंद्र नेढ्याच्या ट्रेक जसा आहे असे कळवले तसे मी सुधीर ला नेढ्याच्या ट्रेक साठी फोन करून होकार कळवला . जस जशी तारीख जवळ येत होती तशी उत्सुकता वाढत होती . कारण हि तसेच होते कारण नेढ्याच्या ट्रेक ह्या आधी खूप कमी जणांनी केला होता . आम्ही सगळे ठरल्या प्रमाणे ५ फेब्रुवारी २०२१ ला रात्री खिरेश्वर इथे मुक्कामी पोहचलो . सुधीर ने ट्रेक ला निघायची ...