सरसगड
ठिकाण - पाली
श्रेणी- मध्यम (पावसात)
सरसगड
गाडीने जायचा बेत होता म्हणून जास्त जण नेऊ शकत नव्हतो. सकाळी ७ वाजता पनवेल एसटी बस डेपो ठिकाण ठरले. तसा मी ही घरातून गाडी घेऊन लवकर निघालो व पनवेल ला लवकर पोचण्याचा प्रयत्न केला तास रस्ता एक तास १० मिनिटाचा आहे पण खड्डे व रस्त्यात झालेल्या ट्रॅफिक मुळे वेळ अधिक लागला.
आमच्या गटातले ४ भिडू माझ्या आधीच पनवेल एस टी डेपो जवळ येऊन उभे राहिले होते. आम्ही क्षणाचा विलंब ही न करता लगेच पाली साठी प्रस्थान केले. एक चांगली गोष्ट अशी की पाली ला जाण्याकरिता दोन रस्ते आहेत एक जुना कोंकण चा रास्ता, व एक पुणे एक्सप्रेस वे आम्ही पुणे एक्सप्रेस वे पकडून निघालो;कारण ही तसंच होत सगळं वेळेत करून घरी ही परतायचं होत. (१३८ रुपयाचा टोल आहे टाळायचा असेल तर जुन्या रस्त्याने जावे)

वैभव हां आमच्या ग्रुप मधला इतिहास-वाचक असल्याकारणाने,आम्हाला कुठल्यानं-कुठल्या नवीन ठिकाणी घेऊन जात असतो. त्याने ह्यवेळेस आम्हाला पालीला जाताना रस्त्यामध्येच लागणारा परळीचा जो पेशवेकालीन गणपती आहे, ज्याची ख्याती पेशवेकाळापासून आहे व महत्वाचं असं कि ह्या सिद्धलक्ष्मी गपतीची मूर्ती उजव्या सोंडेची ,दशभुजा व सिद्धलक्ष्मी मांडीवर अशी आहे .अशी मूर्ती महाराष्ट्रात कुठेही पाहावयास भेटत नाही (जांभूळपाड्याचा सिद्धलक्ष्मी गणेश ). हाय-वे पासून अगदी जवळ सुंदर अस मंदिर आहे, लक्ष्मी मांडीवर घेऊन आनंदाने विराजमान होऊन येणाऱ्या भक्तांना मुक्त पणे आशीर्वाद देनार्या त्या बाप्पा कडे पाहताच डोळ्यात भाव येतोच.
गणपती बाप्पा

परळीचे गणेश मंदिर (आतील बाजू )

मंदिराची बाहेरील बाजू

प्रवेशद्वार
बाप्पाचे दर्शन घेऊन आम्ही सरसगडासाठी मार्गस्थ झालो जाताना पालीच्या बल्लाळेश्वराचे दर्शन घेतले. व गाडी पार्किंग मध्ये लावून लागेल हवे तेवढंच सामान घेऊन गडाकडे प्रस्थान केले, जाताना एक सुंदरशा (Caterpillar) अळी ने आमचे लक्ष वेधले. अगदी आम्ही सगळ्यांनी मनसोक्त त्या जीवाचे फोटो काढून घेतले (त्याला काहीही हानी ना पोहचवता).
बाप्पाचे दर्शन घेऊन आम्ही सरसगडासाठी मार्गस्थ झालो जाताना पालीच्या बल्लाळेश्वराचे दर्शन घेतले. व गाडी पार्किंग मध्ये लावून लागेल हवे तेवढंच सामान घेऊन गडाकडे प्रस्थान केले, जाताना एक सुंदरशा (Caterpillar) अळी ने आमचे लक्ष वेधले. अगदी आम्ही सगळ्यांनी मनसोक्त त्या जीवाचे फोटो काढून घेतले (त्याला काहीही हानी ना पोहचवता).

Caterpillar
वैभव ने दिलेल्या माहितीनुसार गड अर्ध्यातासात सर होतो म्हणून मी शुज न घालता चप्पल घालून आलो होतो ह्या वेळेस पहिल्यांदा नियम मोडला आणि मी त्याची फळ पण भोगली (४ वेळा पडलो) गड जास्त वापरात नसल्याने दगडांवर फार शेवाळ होते ,आणि सगळ्याच वाटेवर शेवाळ साचले होते म्हणून चप्पल घातल्याकरणाने माझी फारच नामुष्की झाली. वैभव ने मला त्याची चप्पल देऊन त्याने अनवाणी चालायचा निर्णय घेतला होता.
कातळात खोदलेल्या पायऱ्या

प्रशांत
चोवकटीत्त विज्ञान व सरसगड
सवंगडी

आमचे इतिहास मार्गदर्शक वैभव

स्वतःचे फोटो काढून घेणारा आमचा गुरु

कातळात खोदलेल्या पायऱ्या
गडावर जसे शेवटच्या टप्यात पोहचलो तश्या पायऱ्या लागल्या फारच धड धाडी भरवणारे दृश्य होते ते पायऱ्या घसरड्या असल्याने हळू हळू चालावे लागत होते. पायऱ्या संपल्या व आम्ही गडाच्या दिंडी दरवाज्यात पोहचलो. वैभव ने किल्ल्याचे ऐतिहासिक महत्व सांगितले व गडाच्या प्रत्येक ठिकाणची माहिती दिली.
दिंडी दरवाजा
आमचे ४ भिडू
ह्यात मी हि
आमच्या ग्रुप चा दुसरा शाहरुख
गुहेकडील बाजू
वैभव इतिहास सांगताना
नर्तक गणेशाचे रूप
गडावरून दिसणारे मनमोहक दृश्य
आम्ही सगळे
ह्यात आमचा शाहरुख सगळ्यात पुढे
पाली ला जाताना कॅमेरात टिपलेला सरसगड
हे सेल्फीवाले
किल्ल्यावरची पाहण्याची ठिकाणे :
सरसगड माची व बालेकिल्ला या दोन भागात विभागलेला आहे. पाली गावातून डोंगरधारेवरून गडाच्या माचीवर जातांना दोन कातळ कड्यांमध्ये (नाळेत) कातळात खोदलेल्या १०० पायर्या चढाव्या लागतात. पायर्यांच्या वाटेवर कातळात कोरून काढलेले प्रवेशव्दार पाहायला मिळते.
प्रवेशव्दारावर कलश कोरलेला आहे. प्रवेशव्दारच्या आतील बाजूस खांब असलेली खोली (देवडी) आहे. पायर्या संपल्यावर आपला दिंडी दरवाजातून माचीवर प्रवेश होतो. दिंडी दरवाजाला लागूनच तिहेरी तटबंदीची रचना आपणास बघावयास मिळते. दरवाजातून आत शिरल्यावर उजवीकडे वळावे आणि १५ पायर्या वर चढाव्यात, म्हणजे तटबंदी दिसते. दरवाज्यातून आत शिरल्यावर डावीकडे गेल्यावर एक मोठा पाण्याचा हौद (‘मोती हौद’) आहे.
पुढे तसेच उत्तरेकडे चालत गेल्यावर पाण्याच एक टाक व वास्तुंचे काही चौथरे पाहायला मिळतात.
अर्धवट परिस्थितील गुहा
उत्तर टोकाला एक दगडांनी बांधलेला दरवाजा आहे. त्याला उत्तर दरवाजा म्हणतात. दरवाजा जवळ एक भुयारी मार्ग आहे. सध्या हा मार्ग मात्र बुजलेला आहे. पुढे गडावर येणारा दुसरा मार्ग आहे. दरवाजातून खाली उतरून गेल्यावर उजवीकडे कातळात खोदलेल्या गुहा आहेत. परत दरवाजाजवळ येऊन डावीकडे गेलो की १५ पायर्या चढाव्या लागतात आणि मग बालेकिल्ल्याचा पायथा लागतो.
पोहोचण्याच्या वाटा :
गडावर जाण्यासाठी मात्र ‘दिंडी’ दरवाजाची वाट वापरात आहे.
दिंडी दरवाजा
पायऱ्या वर चढल्यावर काढलेला फोटो
पाली गावात उतरून या दरवाज्याने गडावर जाता येते. मंदिराच्या मागील बाजूस असणार्या डांबरी रस्त्यावरून डावीकडे वळावे आणि मळलेली वाट पकडावी. ही वाट सरळसोट असून आपणास थेट गडाच्या बुरुजापर्यंत आणून सोडते. बुरुजाच्या पायथ्याशी एक खोली आहे. या खोलीचा उपयोग पहारेकर्यांना राहण्यासाठी होत असे. पुढे दरवाज्यापर्यंत जाण्यासाठी ९६ पायर्या चढाव्या लागतात. या पायर्या जरा जपूनच चढाव्यात कारण पाय घसरला तर दरीत पडण्याचा धोका उद्भवतो. पायर्यांची वाट फार दमछाक करणारी आहे. या पायर्या आपल्याला सरळ दरवाजापर्यंत आणून सोडतात.
भिडूंची नावे :
विज्ञान,वैभव,प्रशांत,शुभम,आणि मी हरीश
खूप छान हरिश...... श्रावणातील पहिला ट्रेक मस्त होता
ReplyDeleteधन्यवाद वैभव असेच ट्रेक सुचवत राहा :)
Deleteamhala pan gheun jaat ja
ReplyDeleteआपले नाव कळेल का पुढच्यावेळेस नक्की सांगेल धन्यवाद
Deleteमस्त सुरवात ..... लिखाण आणि फोटो दोन्ही.
ReplyDeleteधन्यवाद दादा
Deleteमस्त👌👍
ReplyDeleteधन्यवाद जिज्ञेश
Deleteजबरदस्त ब्लॉग झाला आहे मित्रा... एक चांगली सुरवात ... ट्रेक पण मस्त झाला ... धन्यवाद्य तुझे आणि तुझ्या स्विफ्ट गाडीचे ;)
ReplyDeleteधन्यवाद प्रशांत तुझ्याकडून शिकतोय अशीच मदत आणि प्रोत्साहन देत राहा तुमच्यासारखे सोबती असेल कि ट्रेक चांगलाच होतो
Deleteमस्त हरीश! छान लिहिलयं
ReplyDeleteधन्यवाद अमित
DeleteKhup chan
ReplyDeleteKhup chan
ReplyDeleteThank you
DeleteKhup chan
ReplyDeleteसुंदर वर्णन, ट्रेक छोटा असो वा मोठा बूट आवश्यक आहेच..
ReplyDeleteएकटे जाता काळजी घ्या रे...
धन्यवाद मित्रा अमोल नक्की काळजी घेऊ
DeleteLucky Club Casino Site – How to Make Online Betting
ReplyDeleteLuckyClub Casino review. LuckyClub is an online gambling site created by BetVictor, one of the leading online bookmakers. As luckyclub a punter, you can win
One of the good things about taking part in} free on-line roulette is the number of totally different games on offer. Unlike the classic version you may find at land casinos in 2022, taking part in} at anonline roulette casinoopens a world of exclusive roulette variations unavailable elsewhere. There is not any brief answer to this question, as each state has their own particular playing laws. And while a lot of them have legalized some form of playing, most are hesitant to allow on-line casinos. However, the betmove list of states providing authorized on-line roulette is steadily rising and you can certain to|make positive to|remember to} find great bonus provides in these states. The main difference between on-line and land-based roulette is the real wheel and the fact that|the fact that} the croupier spins the wheel and handles the bets.
ReplyDeleteWas it because of|as a outcome of} if a participant had been shedding their money too rapidly - resulting in a shorter machine play time - the machine would "compensate" by paying out more before the top of the taking part in} time? This time of play adjustment would then enable on line casino patrons, each on and offline, to "really feel" they'd value for money {due to the|because of the|as a outcome of} adjusted extension of taking part in} time on the machine. On some progressive jackpots linked to a bank of slot machines, the jackpot needs to be gained before a sure sum of money is reached. Now, that is the case|if so|if that is so}, how are they REALLY random if they that they} should hit 바카라사이트 before the jackpot reaches a sure amount? They have to be programmed strive this|to do this} if they that they} should hit by {a sure amount|a specific amount|a sure quantity}.
ReplyDelete